Badlapur News : बदलापूरमध्ये २ चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ नागरिक रस्त्यावर उतरले असून, आरोपीला फाशी देण्याची मागणी होत आहे. SAAM TV
Video

Badlapur Crime: आरोपीला शाळेसमोरच फाशी द्या, बदलापूरकरांमध्ये प्रचंड संताप, पाहा VIDEO

Badlpaur Student Abused Latest Update News : बदलापूरमध्ये नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणी येथील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. आरोपीला शाळेसमोरच फाशी द्या, अशी मागणी होत आहे.

Nandkumar Joshi

नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर तेथील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सकाळी सुरू झालेले आंदोलन पाच तास उलटून गेले तरी सुरूच होते. सुरुवातीला शाळेच्या समोरच शेकडो पालकांनी आंदोलन केले. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, शाळा प्रशासनाविरोधात कारवाई करा, कानाडोळा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी पालकांनी केली. त्यानंतर काही तासांतच या आंदोलनाचे लोण सर्वत्र पसरले. सर्व नागरिक या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले होते. तर रेल्वे स्थानकातही हजारो प्रवासी आणि नागरिक एकत्र आले आणि रुळांवर आंदोलन केले. या रास्तारोकोमुळं रेल्वे सेवाही ठप्प झाली.

दुसरीकडे महिलांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही काय शिक्षा द्यायची ते बघून घेऊ, असा संताप व्यक्त केला जात आहे. साहेब, आम्हाला एक वेळ लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल, पण सुरक्षित बहीण योजना पाहिजे, असे पोस्टर झळकावत थेट मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली. आरोपीला शाळेसमोरच फासावर लटकवा, अशी मागणीही महिलांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT