बदलापूरच्या रेल्वे स्थानकावरील स्कायवॉकवर एका महिलेला तरुणाकडून मारहाण केली जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. saam tv
Video

Badlapur Video : बदलापूर स्कायवॉकवर जोडप्याचा 39 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल, महिलेला कोण मारहाण करतंय?

Badlapur News : बदलापूरमध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे स्थानकाच्या पुलावरील जोडप्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यात एका तरुणाकडून तरुणीला मारहाण होत असल्याचे दिसते.

Mayuresh Kadav

बदलापूर रेल्वे स्थानकावरील स्कायवॉकवर एका महिलेला मारहाण झाल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. त्याचा व्हिडिओ 'साम टीव्ही'च्या हाती लागला आहे. एका सजग नागरिकानं मोबाइलमध्ये हा व्हिडिओ शूट केला आहे. या घटनेमुळं रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बदलापूर पश्चिमेकडील स्कायवॉकवर एक व्यक्ती महिलेला बेदम मारहाण करताना या व्हिडिओत दिसत आहे. त्याच परिसरात राहणाऱ्या एका रहिवाशाने आपल्या मोबाइलमध्ये हा प्रकार चित्रित केला. हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असणारं बदलापूर स्थानक आणि स्कायवॉकवर सुरक्षेची कोणतीही ठोस यंत्रणा दिसून येत नसल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महिलेला मारहाण करणारा हा तरूण कोण? त्यानं तिला मारहाण का केली असावी, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खालावली

BJP Setback : भाजपची डोकेदुखी वाढली! माजी आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, थेट पक्षावर काढला राग

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड; तीन आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी

Dry Day: पुण्यासह संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीत दारू विक्रीबंदी; किती तारखेपर्यंत बंद असणार दारूची दुकानं?

अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम, तब्बल १२ जणांचे पुनर्वसन

SCROLL FOR NEXT