Badlapur Protest News  Saam Tv
Video

Badlapur Protest News : बदलापूर अत्याचार प्रकरण; जमाव संतप्त, दोन तासांपासून रेल रोको सुरू VIDEO

minor school girl abuse case people protest : बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे जमाव संतप्त झालाय. मागील दोन तासांपासून बदलापूरमध्ये रेल रोको करण्यात आलाय.

Rohini Gudaghe

मुंबई : बदलापूरमध्ये दोन तासांपासून रेल रोको सुरू आहे. शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पालकांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. पोलीस पालकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. बदलापूरमध्ये मोठ्या संख्येने पालक रस्त्यावर उतरल्याचं दिसत आहे. बदलापूरमध्ये चार वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाला होता, याविरोधात आता संतापाची लाट शहरात उठली आहे.

शाळेत चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संतप्त बदलापूरकरांचं गेल्या दोन तासांपासून आंदोलन सुरू आहे. बदलापूर बंदची हाक देण्यात आलीय. दोषींना फाशी द्या, अशी मागणी आंदोलक बदलापूरमध्ये करत आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावर हजारो बदलापूरकर एकवटले आहेत. आरोपीला तात्काळ अटक करा कठोर शिक्षा द्या, अशी मागणी केली जातेय. उड्डाणपुलावरील वाहतूक बंद पाडण्यात आलीय. एका सफाई कामगाराने शाळेतच्या चार वर्षाच्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT