Badlapur Case saam tv
Video

Badlapur Case : बदलापूरमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, आरोपीला पोलीस कोठडी; कोर्टात काय झालं?

Badlapur Girl Assault Case : बदलापूरमध्ये ४ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून, कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Nandkumar Joshi

बदलापूरमध्ये ऑगस्ट २०२४ मध्ये एका शाळेतील दोन मुलींवरील अत्याचाराची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर बदलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर बदलापूरमध्ये मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात आता पुन्हा शाळेतील ४ वर्षांच्या बालिकेवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. शाळेत ने-आण करणाऱ्या व्हॅनचालकानं बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर बदलापूरवासियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीला अटक केली.

या आरोपीला कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने आरोपीला २७ जानेवारीपर्यंत म्हणजेच तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कसं उघडकीस आलं हे प्रकरण?

पीडित बालिका ही एका शाळेत शिकतेय. ती एका स्कूलव्हॅनमधून दररोज शाळेत ये-जा करायची. ज्या व्हॅनमधून ती शाळेत जायची, त्या व्हॅनच्या चालकाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलगी घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. ते ऐकून पालकांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ बदलापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

झाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू; मुंबईकरांचा वाली कोण? मुर्दाड महापालिकेला कधी जाग येणार?

Pune School: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

School Holiday: मोठी बातमी! ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह नवी मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी

Pune News: कात्रज तलावाच्या कठड्यावरून खाली पडला, ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- चिपळूणच्या वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली

SCROLL FOR NEXT