Baba Siddique Case Update  Saam tv
Video

Baba Siddique Case: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात झिशान सिद्दिकींचा मोठा दावा, थेट मोहित कंबोज यांचे नाव घेतलं

Zeeshan Siddique On Mohit Kambojs: काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. झिशान सिद्दिकी यांनी या प्रकरणाचा जबाब देताना १० बिल्डरांची नावं घेतली आहे. यावेळी त्यांनी मोहित कंबोज यांचे देखील नाव घेतलं.

Priya More

काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकींनी खळबळजनक दावा केला आहे. झिशान सिद्दिकीने पोलिसांना दिलेल्या जबाबात १० बिल्डर्स आणि भाजप नेते मोहित कंबोजचं नावं घेतल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिली आहे. हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या डायरीत मोहित कंबोज यांचं नाव असल्याचा उल्लेख झिशान सिद्दिकींनी केला आहे.

झिशान सिद्दिकी यांनी मोनज कंबोज यांच्यावर आरोप केले नाहीत. मात्र बाबा सिद्दिकी यांनी ज्यांच्यासोबत शेवटच्या गप्पा मारल्या ते मोहित कंबोज असल्याचे झिशान यांनी म्हटलं आहे. झिशान सिद्दिकींनी केलेल्या आरोपात मुंद्रा बिल्डर्स, पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोएंका आणि ओंकार बिल्डर्स या नामांकित बिल्डर्सच्या नावांचा उल्लेख केला आहे.

एसआरए प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानेच हत्या झाल्याचा दावाही झिशान सिद्दिकीने केल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. तर दुसरीकडे बाबा सिद्दिकींची हत्या बिष्णोई गँगनेच केली या दाव्यावर मुंबई पोलिस ठाम आहेत. पोलिसांकडून या हत्या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT