Baba Siddique SaamTv
Video

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा! पाहा Video

Baba Siddique Death Case Update : राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबरला यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. त्यात आता नवीन माहिती समोर आली आहे.

Saam Tv

राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात नवीन माहिती पुढे आली आहे. चौघा आरोपींना दुबई ट्रीपचं आमिष दाखवण्यात आलं होतं. त्याचबरोबर २५ लाख रोख रक्कम, कार आणि घर देण्याचं देखील कबूल करण्यात आलं होतं.

राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दिकी यांची त्यांच्याच कार्यालयाबाहेर 12 ऑक्टोबरला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता पोलीस तपासातून अनेक मोठे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील चारही आरोपींना दुबई ट्रीप आणि त्याचसोबत २५ लाख रोख रक्कम, कार आणि घर देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. आरोपी रामफुलचंद कनोजिया याने रुपेश मोहोळ, शिवम कोहड, करण साळवे आणि गौरव अपुने यांना हे आमिष दिल्याचं चारही आरोपींनी चौकशीत सांगितलं आहे. आत्तापर्यंत बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणी 18 जणांना अटक करण्यात आली आहे. याआधी ही हत्या केवळ २ लाखांसाठी करण्यात आली असल्याच पोलीस तपासात उघड झालं होत. आता आणखीन नवीन खुलासे चौकशीतून समोर येत आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT