Pune News SaamTv
Video

Baba Siddique Murder : बाबा सीद्दिकी हत्याप्रकरणाचं पुणे कनेक्शन; प्रविण लोणकरला अटक

Pune News : वांद्रेमध्ये बाबा सीद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर आता त्यांच्या हत्येचे धागेदोरे पुण्यात देखील सापडले आहे. त्याआधारे मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे.

Saam Tv

वांद्रेमधील बाबा सीद्दिकी हत्येप्रकरणी पुण्यातून आरोपी प्रविण लोणकरला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीअजित पावर गटाचे नेते बाबा सीद्दिकी यांची शनिवारी रात्री वांद्रे परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या हत्येच पुणे कनेक्शन उघड झालं आहे. त्या आधारे मुंबई गुन्हे शाखेने पुण्यातून एका आरोपीला तब्यात घेतलं आहे. प्रविण लोणकर असं या आरोपीचं नाव आहे. प्रविण हा शुभम लोणकरचा भाऊ आहे. लोणकर बंधूंच्या दूध डेरीवरून प्राविणला पोलिसांनी तब्यात घेतलं आहे. प्रविण लोणकर यानेच तिन्ही आरोपी धर्मराज कश्यप, शिवकुमार गौतम आणि कर्नीलसिंह यांना राहण्यासाठी खोली भाड्याने दिली होती. हे तिघं पुण्यात लोणकरयाच्या डेअरी शेजारीच भंगार गोळा करण्याचं काम करायचे. इथूनच ते मुंबईला येऊन रेकी करत होते. त्यासाठी प्रविण यानेच त्यांना खोली दिली होती. अशी माहिती तपासातून समोर आल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी प्रविण लोणकर याला पुण्यातून तब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT