chhatrapati sambhajinagar  
Video

Assembly Election: बोटाला शाई लावून 1500 रुपयांचं वाटप; छत्रपती संभाजीनगरमधील व्हिडिओ आला समोर

chhatrapati sambhajinagar : मतदानकार्ड जमा करून 1500 रुपये देणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Bharat Jadhav

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील औरंगाबाद पश्चिम मतदार संघात मतदारांना पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. छत्रपती संभाजीनगरच्या इंदिरा नगर भागातील एक घटना समोर आली आहे. पैसे वाटताना मतदारांच्या बोटाला शाई लावली गेल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. औरंगाबाद पश्चिम मतदार संघात लोकांनी मतदान करू नये म्हणून त्यांच्याकडील मतदान कार्ड जमा केले जात आहे. आणि त्यांना 1500 रुपये दिले जात आहेत. दरम्यान मतदानकार्ड जमा करून 1500 रुपये देणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात आल्याची माहिती समोर आलीय. आपल्याला मत देणार नाहीत, अशा लोकांनी मतदान करू नये म्हणून दीड हजार रुपये देऊन मतदानकार्ड जमा केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. तसेच आतापर्यंत तब्बल पाच हजार मतदानकार्ड जमा केल्याचा दावा देखील करण्यात आलाय. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्यात सदरील व्यक्तीची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramayana Cast : रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कोण कोणती भूमिका साकारणार? माता सीतेच्या लूकनं वेधलं लक्ष

Maharashtra Live News Update : हनुमान जयंतीनिमित्त अमरावतीच्या हनुमान गढीवर आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवणीत राणाचं हनुमान चालीसेचं पठण

एकनाथ शिंदेंचा ओएसडी असल्याचा बनाव! पुण्यात थेट पोलीस उपायुक्तांवर टाकला दबाव

IDBI Recruitment: IDBI बँकेत नोकरी करण्याची संधी; पगार मिळणार १.९७ लाख; अर्ज कसा करावा?

Cheese paratha recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता हा चीज पराठा; झटपट तयार होणार पदार्थ मुलांनाही आवडेल

SCROLL FOR NEXT