Ashok Kharat news Update saam tv
Video

Ashok Kharat Update : भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची कोठडी, कोर्टात काय काय घडलं?

ashok kharat judicial custody 14 days sit custody third case court update news : भोंदू अशोक खरात याला आज, बुधवारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खरातवरील दाखल दुसऱ्या गुन्ह्यात ही कोठडी सुनावण्यात आली आहे. तर तिसऱ्या गुन्ह्यात एसआयटी त्याचा ताबा घेणार आहे.

Nandkumar Joshi

अभिजीत सोनावणे, नाशिक | साम टीव्ही

भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) व्हीसीद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. दुसऱ्या गुन्ह्यात त्याला ही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्याच्यावर दाखल असलेल्या तिसऱ्या गुन्ह्यात एसआयटी ताबा घेणार आहे. त्यानंतर २४ तासांच्या आत पुन्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवेळी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

न्यायालयात आज नेमके काय झाले?

भोंदूबाबा अशोक खरात याला दुसऱ्या गुन्ह्यात व्हीसीद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर खरात याने दोन्ही हात जोडून आपले नाव सांगितले. दुसऱ्या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने कोठडी सुनावली. तिसऱ्या गुन्ह्यात ताब्यात द्यावे यासाठी एसआयटीने न्यायालयात अर्ज दाखल केला. तो मंजूर करण्यात आला. या तिसऱ्या गुन्ह्यात उद्या, गुरुवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. एसआयटीकडून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी सांगितले की, आरोपी खरातविरोधात दुसरा गुन्हा दाखल आहे. त्यात त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयात एसआयटीने अर्ज दाखल केला आहे. तो मंजूर केला असून, उद्या त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

Shiv Sena Hearing LIVE Updates : शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, कोर्टात काय काय झालं?

Maharashtra News Live Update: मांडवा फॉरेस्ट उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या दोन गटांत तुफान हाणामारी, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT