Pandharpur Wari Saam TV
Video

Ashadhi Wari : पुणे शहरातल्या संगमवाडीत तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचा संगम|VIDEO

Sant Tukaram and Dnyaneshwar Palkhi : संगमवाडीत तुकोबा आणि माऊलींचा पालखीचा संगम होणार आहे. पुण्यात पालख्यांचा दोन दिवस भक्तिमय मुक्काम असणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पुणे शहरात मोठ्या भक्तिभावाने दाखल झाल्या आहेत. पुण्यातील संगमवाडीत आज या दोन पवित्र पालख्यांचा भव्य संगम होणार असून, भाविकांच्या गर्दीत आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात हा सोहळा पार पडणार आहे.आजच्या पालखी संगमानंतर पुढील दोन दिवस तुकोबा आणि माऊलींच्या पालख्यांचा पुण्यात मुक्काम असणार आहे.

तुकाराम महाराजांची पालखी निवडुंगा विठ्ठल मंदिरात तर माऊलींची पालखी भवानी पेठेतील विठोबा मंदिरात विसावणार आहे.पुणेकरांनी मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने दोन्ही पालख्यांचे स्वागत करणार असून, संपूर्ण शहर भक्तिरसाने न्हालं आहे. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला असून, रस्त्यांवर भक्तांची मोठी गर्दी दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT