pandharpur news  saam tv
Video

Ashadhi Wari: आषाढी एकादशीच्या पार्श्वभमीवर व्हीआयपी दर्शनाला चाप बसणार|VIDEO

No More Influence-Based Entry: भाविकांना विठुरायाचे वेळेत आणि सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रणाली येत्या 15 जून पासून सुरू करण्यात येणार आहे

Omkar Sonawane

पंढरपूर: विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या विचारात घेता मंदिर प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात मंदिर समितीने एक परिपत्रक देखील प्रसिद्ध केले आहे.

आषाढी यात्रेच्या निमित्ताने आत्तापासूनच पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे येणाऱ्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे वेळेत आणि सुलभ दर्शन व्हावे यासाठी वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून वशिल्याच्या दर्शनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे यामुळे दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत असल्याचा प्रकार घडत आहे यावर आता मंदिर समितीने वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंदिर समितीचे अध्यक्ष सदस्य आणि कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय यापुढे कोणालाही मंदिरात दर्शनासाठी सोडले जाणार नाही असा लेखी आदेश कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरच्या प्रशासकीय इमारतीत अस्वच्छतेचा कळस

5 Sweet Foods For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी ५ गोड पदार्थ फायदेशीर; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

H1N1 flu symptoms: साधा ताप समजून दुर्लक्ष करताय? H1N1 ची ही गंभीर लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या

Tingling In Feet : तुमच्या पायांना सतत मुंग्या येतात; 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, असा कराल बचाव?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा? 14,298 पुरुषांना मिळाले ₹1,500; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT