Saam
Video

नीटनंतर आता E20 पेट्रोलवरून केंद्र सरकारविरोधात एल्गार, पंतप्रधान निवासस्थानावर मार्च

Arvind Kejriwal : ई20 पेट्रोल धोरणाविरोधात आम आदमी पक्षाने आंदोलनाची घोषणा केली आहे. अरविंद केजरीवाल पंतप्रधान निवासस्थानावर मोर्चा काढणार असून दोन लाख नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्याचा दावा केला आहे.

Namdeo Kumbhar

नीट (NEET) पेपरफुटीच्या वादळानंतर आता देशात E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून नवे राजकीय युद्ध पेटण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी E20 पेट्रोलविरोधात थेट पंतप्रधान निवासस्थानावर मार्च काढण्याची घोषणा केली आहे.

या आंदोलनादरम्यान केजरीवाल तब्बल २ लाख नागरिकांच्या ऑनलाइन स्वाक्षऱ्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोपवणार आहेत. आपल्या शंभर प्रमुख समर्थकांसह आपण स्वतः पंतप्रधानांच्या भेटीसाठी निघणार असल्याचे केजरीवालांनी स्पष्ट केले आहे. E20 इंधनामुळे वाहनांचे होणारे नुकसान आणि सामान्य जनतेवर पडणारा आर्थिक भार याविरोधात हा मोर्चा काढला जात आहे. NEET प्रकरणापाठोपाठ आता या मुद्द्यावरूनही केंद्र सरकारची कोंडी करण्याचा 'आप'चा प्रयत्न असून, आगामी काळात हा वाद अधिक पेटण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : सणांच्या घाईत त्वचेसोबत 'ही' चूक होत नाही ना? नॅचरल ग्लो हवा असेल, तर आजपासूनच करा हे ५ बदल

Private Part Hygiene Tips: प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका! ‘या’ ५ गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या

Maharashtra News Live Update: ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात विशेष दर्शन पाससाठी डिजिटल पेमेंट सुरू करण्याची मागणी

Aadhaar Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! मोबाईल नंबर बदलण्यासाठी ही प्रोसेस करा फॉलो

Auto Drivers Strike : मुंबईत परप्रांतिय चालकांचा संप, ३ दिवस रिक्षा-टॅक्सी बंद; कारण ऐकून तुम्हालाही राग येईल

SCROLL FOR NEXT