Ratnagiri Saam TV
Video

Ratnagiri : राजापूरमध्ये मुसळधार पाऊस; अर्जुना धरण ओव्हरफ्लो | VIDEO

Arjuna Dam : राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, सांडव्यावरून ३.५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर सुरू आहे.त्याचा परिणाम म्हणून अर्जुना धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होऊ लागलं आहे.राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, सांडव्यावरून ३.५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणात सध्या २.६४ टीएमसी एवढा पाणीसाठा असून, आज अखेर धरण परिसरात २,०२३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान धरण परिसराची कार्यकारी अभियंता विवेक सोनार यांनी उपविभागीय अभियंता व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली. धरण व त्याची इतर उपसंरचना सुस्थितीत असून परिसर सी.सी.टीव्हीच्या निगराणीखाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.दरम्यान सांडव्यावरील विसर्गामुळे अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे जलसंपदा विभागामार्फत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेनेच्या वर्धापन दिनी भावनांचा बांध फुटला; सुषमा अंधारेंना रडू कोसळले|VIDEO

Maharashtra News Live Update: मोबाईल, सोने अर्ध्या किमतीत देतो सांगून फसवणाऱ्या ठगाला पोलिसांनी केली अटक

कोणतीही ऑफर नाही; पहिल्या दिवसापासून ठाकरेंसोबतच! शिवसेनेच्या निष्ठावंत खासदाराची ठाम भूमिका|VIDEO

Meloni Vs Trump : मेलोनी डोनाल्ड ट्रम्पवर संतापल्या; म्हणाल्या, मी कधीच कुणाकडे भीक मागत नाही!

Father’s Day Gift Ideas: फादर्स डे ला वडिलांच्या चेहऱ्यावर आणा हसू; हे ७ गिफ्ट आयडिया ठरतील बेस्ट

SCROLL FOR NEXT