Amruta Fadnavis SaamTv
Video

Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या संघर्षाचा काळ पाहिलाय, अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Oath Taking Ceremony : मुंबईच्या आझाद मैदानावर आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. नवीन सरकारच्या या सत्तास्थापनेच्या सोहळ्यासाठी उपस्थित देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

Saam Tv

देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या संघर्षाचा काळ पाहिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळातच महिलांचा प्रतिसाद पाहून सर्वांना देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून हवे असल्याचं जाणवत होतं, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडत आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून यावेळी शपथ घेणार आहेत. या सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यावेळी मध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, लाडकी बहिण योजना खुप चांगली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या संघर्षाचा काळ पाहिला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळातच महिलांचा प्रतिसाद पाहून सर्वांना देवेंद्र फडणवीस पुन्हा हवे असल्याचे जाणवत होते. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा विकास करतील आणि चांगल्या योजना राबवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT