अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  Saam TV
Video

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

Manoj Jarange On Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी दिलेल्या जेवणाच्या निमंत्रणावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साडी-चोळी घेऊन भाऊबीजेला बहिणीकडं नक्की जाऊ, असं जरांगे म्हणाले.

Nandkumar Joshi

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. आंदोलन सुरू असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जरांगे पाटील यांना जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. मनोज जरांगे हे माझे भाऊ आहेत, त्यांना मी जेवणाचं निमंत्रण देते, असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या. त्याबाबत आज, गुरुवारी जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली.

जरांगे पाटील यांनी अमृता फडणवीस यांचा उल्लेख वहिनी म्हणून केला. पण आंदोलनाच्या काळात जेवणाचं निमंत्रण स्वीकारणं योग्य वाटत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. भाऊबीजेच्या दिवशी आपण बहिणीकडे साडी-चोळी घेऊन नक्की जाऊ, असेही ते म्हणाले. आमच्या बहिणीने आम्हाला भाऊबीजेला बोलवावं, साडी-चोळी घेऊन जातो. पण लढाईच्या मैदानात असताना जेवायला बोलवू नये. ताईंनी ती विचार आणि दृष्टिकोन, तसेच मायेची भावना आमच्या बाजूने ठेवावी, असंही जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT