AMRAVATI TEACHERS CONSTITUENCY EXIT POLL 2026 saam tv
Video

महायुतीला बंडखोरीचा फटका? सामच्या Exit Poll मध्ये काँग्रेस आघाडीवर|VIDEO

Saam TV Exit Poll Amravati Teachers Constituency Election: अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरीमुळे मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसच्या आदिती पोहरे यांचे पारडे जड असल्याचे पाहायला मिळत आहे.

Omkar Sonawane

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आज अत्यंत शांततेत पार पडली. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांत वातावरणात संपन्न झाली.

या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्यासमोर बंडखोरांचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. दुसरीकडे, महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवल्याने त्याचाही फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रचारादरम्यान या सर्व घडामोडींवर राजकीय नेत्यांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. आता या निवडणुकीत बंडखोरीचा नेमका फटका कोणाला बसणार आणि विजयाची बाजी कोण मारणार, हे येत्या २७ तारखेला होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होईल. तर साम टीव्हीच्या Exit Poll मध्ये काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांचे पारडे जड दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bridal Beauty Kit: नवरीच्या मेकअप किटमध्ये काय असावं? लग्नाच्या दिवशी उपयोगी पडतील या ७ गोष्टी

Exit Poll: संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत, कोण होणार आमदार? एक्झिट पोलचा अंदाज आला समोर

Maharashtra News Live Update: - माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतले वडील पंडित अण्णा मुंडे यांच्या समाधीचे दर्शन

Pune : स्मिता जाधव की हर्षदा देशमुख, पुणे पदवीधरचा भावी आमदार कोण? Exit चा धक्कादायक अंदाज

Kojagiri Purnima : कोजागिरी पौर्णिमेला बनवा घरच्या घरी हलवाई स्टाइल मलाईदार रबडी, वाचा झटपट होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT