Amravati News SaamTv
Video

Amravati Breaking : हत्यांच्या घटनांनी अमरावती शहर हादरलं

Ravi Rana Warned To Protest : गेल्या 10 दिवसांत अमरावतीत 7 हत्या झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर आरोपींना अटक न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा रवी राणा यांनी दिला आहे.

Saam Tv

अमरावती शहर हत्यांच्या घटनांनी हादरलं आहे. गेल्या 10 दिवसात 7 जणांच्या हत्या अमरावतीत झाल्या आहेत. या घटनांनंतर आता अमरावतीतील नागरिक संतप्त झाले असून सिटी कोतवाली पोलिस ठाण्याबाहेर नागरिकांनी आंदोलन सुरू केलं आहे. शेकडोच्या संख्येने याठिकाणी नागरिक जमलेले बघायला मिळत आहेत.

काल रात्री अमरावतीच्या चित्रा चौकात गोलू उसरेटे या युवकाची हत्या झाली आहे. गेल्या 10 दिवसंतील हे सातवे प्रकरण आहे. त्यामले कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या हत्येनंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून शेकडो नागरिक सिटी कोतवाली पोलीस ठाण्यावर जमले आहेत. हत्या करणाऱ्या आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारनार नाही अशी भूमिका यावेळी नागरिकांकडून घेण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर रवी राणा देखील आक्रमक झाले असून अमरावती शहरातील तडीपार गुंडांना पोलिसांनी अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

SCROLL FOR NEXT