VIDEO : जनसन्मान यात्रेत अजितदादांना काळे झेंडे, Amol Mitkari यांचा फडणवीसांना संतप्त सवाल SAAM TV
Video

VIDEO : जनसन्मान यात्रेत अजितदादांना काळे झेंडे, Amol Mitkari यांचा फडणवीसांना संतप्त सवाल

Amol Mitkari on Jansanman Yatra Bjp Protest : पुण्यातील जुन्नर येथे अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला भाजपकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीसांना संतप्त सवाल केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत भाजपच्या माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आशा बुचके यांनी काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवून अजित पवार यांचा एक प्रकारे अवमान केल्याचा प्रकार केला आहे, त्याच उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यावे,आणि त्यांनी तात्काळ आपली भूमिका व्यक्त मांडावी..अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. एक प्रकारे काळे झेंडे दाखवून भाजपला काय पुरुषार्थ साधायचं आहे? भाजपचा याला समर्थन आहे का? असा सवाल मिटकरींनी उपस्थित करत, भाजपनं तात्काळ याचा खुलासा केला पाहिजे, असेही ते म्हटले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT