Amit Thackeray And Sada Sarvankar Saam TV
Video

दोघेही उमेदवार समोरासमोर आले, सरवणकरांच्या जॅकेटवरचा धनुष्यबाण अमित ठाकरेंनी सुलटा केला, VIDEO

Amit Thackeray And Sada Sarvankar : मनसेचे उमेदवार आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर हे दोघेही समोरासमोर आले. दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

Nandkumar Joshi

मुंबईतील दादर-माहीम मतदारसंघात हायव्होल्टेज लढत होत आहे. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे, शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत हे निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी आज मतदान होत असताना, वरळीत शिंदे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळाला. पण माहीमच्या आखाड्यात उतरलेले उमेदवार अमित ठाकरे आणि शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांच्यातल्या संवादाचं वेगळंच चित्र पाहायला मिळालं.

या मतदारसंघात दुर्मिळ असं चित्र पाहायला मिळालं. ठाकरे आणि सरवणकर हे मतदानाच्या दिवशीच सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेले होते. त्याचवेळी हे दोघे विरोधी उमेदवार समोरासमोर आले होते. दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सरवणकरांनी घातलेल्या जॅकेटवर धनुष्यबाणाचं चिन्ह उलटं झाल्याचं अमित ठाकरेंच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच त्या जॅकेटवरचा धनुष्यबाण सुलटा करून दिला.

यावेळी अमित ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक लोक भेटत आहेत. शुभेच्छा देत आहेत. खूपच चांगला प्रतिसाद आहे. वारं बदलतंय. पहिल्यांदाच निवडणुकीला उभं राहिलोय. उत्तम प्रतिसाद मिळतोय, असं अमित ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Protest : मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांकडे अर्ज; परवानगी मिळणार का?

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! डायरेक्ट ₹५१००० वाढणार पगार, निवृत्ती वेतनधारकांचीही होणार चांदी

Maharashtra News Live Update: अमरावतीत एकाच कुटुंबातील सख्ख्या चिमुकल्या बहिण भावाला सर्पदंश

Nath Design: सणासुदीला मराठमोळ्या लूकसाठी 'या' ७ नथ नक्की ट्राय करा; नऊवारी, साडी आणि ड्रेसवर दिसाल सुंदर

राज्य महिला आयोगावर डॅशिंग अधिकाऱ्याची नियुक्ती; 3 IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT