Amit Shaha SaamTv
Video

Amit Shaha News : सत्ता स्थापनेच्या बैठकीत शरद पवार होते? अमित शहा यांचा मोठा खुलासा, पाहा Video

Saam TV Exclusive : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीच्या दाव्यांवर मोठं भाष्य केलं आहे. साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

Saam Tv

भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी झालेल्या बैठकीत शरद पवार उपस्थित होते, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. शरद पवार यांनी हे दावे फेटाळले होते. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या बद्दल भाष्य केलं आहे. साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शरद पवार यांच्या सोबतच्या बैठकीवर स्पष्टीकरण दिलं आहे. या बैठकीत नेमकं काय झालं होतं याचा पूर्ण घटनाक्रमच अमित शहा यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या दोन तीन दिवसांपासून अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या मोठ्या खुलाशानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. सत्तास्थापन करण्यासाठी भाजपसोबत झालेल्या बैठकीत स्वत: शरद पवार उपस्थित होते. त्यांनी वेळेवर निर्णय बदलल्याने सगळा दोष माझ्यावर आला, असा मोठा खुलासा अजित पवार यांनी केला होता. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी देखील अजित पवार यांच्या या दाव्याला दुजोरा दिला होता. त्यानंतर शरद पवार यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र आता खुद्द भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल माहिती दिली आहे. शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीवर अमित शहा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. असे दावे होत राहतात. ते आमच्याविरुद्ध रिंगणात आहेत आणि त्यांचा पराभव निश्चितच होणार आहे, हे मात्र खरे आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather update: देशावर यंदा दुष्काळाचं सावट,जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं

Fact Check: खरंच सरकारनं गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

Maharashtra Live News Update: श्रीरामपूरमध्ये हॉटेलवर छापा; घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर उघड, 10 सिलिंडर जप्त

ICC Ranking : टी २० रँकिंगमध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताचा दबदबा; संजू सॅमसननं घेतली मोठी झेप, टॉप १० मध्ये कोण-कोण?

Solapur Crime: सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

SCROLL FOR NEXT