Eknath Shinde Complains to Amit Shah About BJP Leaders saamtv
Video

शाहाच काढणार शिंदेंचा कोथळा, 'शिंदेंचे 35 आमदार फुटणार, राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut claims 35 Shinde MLAs will defect संजय राऊतांनी धक्कादायक दावा करत शिंदेसेनेतील ३५ आमदार फुटणार असल्याचं म्हटलं आहे. अमित शाह शिंदेसेनेचा ‘कोथळा’ काढणार असल्याचं वक्तव्य केले.

Namdeo Kumbhar

एकनाथ शिंदेंचे 35 आमदार फुटणार आहेत, असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय.. त्यामुळे राऊतांनी कमबॅक करताच विरोधकांवर कसा प्रहार केलाय ? शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न नेमकं कोण करतयं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

आजारपणामुळे महिनाभर राजकीय जीवनातून ब्रेक घेतलेल्या राऊतांनी कमबॅक करताच विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय.. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहच शिंदेसेनेचा कोथळा काढणार आहेत. शिंदेंचे 35 आमदार फुटणार, असा खळबळजनक दावा राऊतांनी केलाय...

दरम्यान राऊतांनी केलेल्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सारवासारव केलीय. दोन्ही नेत्यांनी राऊतांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देत टोला लगावलाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. भाजपनं ठाणे, अंबरनाथमध्ये शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गळाला लावलयं. ठाण्यासह सिंधुदुर्ग, हिंगोली, सांगोलामध्ये भाजप आणि शिंदे सेनेमधील वाद टोकाला गेलाय. अशातच राऊतांनी शिंदेंचे 35 आमदार फुटणार असल्याचा दावा केल्यानं शिंदेसेनेतील अस्वस्थता आणखी वाढतेय. महायुतीतील वाद शमणार का? आणि शिंदेसेना एकसंध ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे कोणती रणनीती आखतात? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT