Ambernath News  Saam tv
Video

Ambernath News : बंदूका, कोयते आणि समर्थक; अंबरनाथमध्ये भाजप आणि शिंदे गटात पुन्हा वाद, पाहा व्हिडिओ

Ambernath politics : कल्याणमधील भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांमधी जुना वाद कायम असल्याचे समोर आले आहे. त्याच जमिनीच्या वादातून पुन्हा दोन्ही पक्षातील नेते पोलीस स्टेशनला गेले आहेत.

अजय दुधाणे

अंबरनाथ : कल्याणमधील भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांमधील जुना वाद कायम असल्याचे समोर आले आहे. अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागेवरून झालेला भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यातील वाद कायम असल्याचे समोर आले आहे. ज्या जागेवरून या दोघांमध्ये गोळीबार करण्यापर्यंत टोकाचे वाद झाले. त्याच जागेची पुन्हा एकदा मोजणी करण्यात आली आहे. मोजणीच्या ठिकाणी आमदार गणपत गायकवाड यांचा एक समर्थक हत्यार घेऊन आल्याचा महेश गायकवाड यांचा दावा आहे.

दोन्ही पक्षातील नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपानंतर प्रकरण पुन्हा उल्हासनगर हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये गेलं. उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. त्याच्या बॅगेत बंदूक आणि हत्यार सापडले आहेत. ही बंदूक वैध आहे की अवैध याची तपासणी सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT