Ambenali Ghat Saam TV
Video

Ambenali Ghat : आंबेनळी घाटात दरड कोसळल्यामुळे महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग बंद | VIDEO

Mahabaleshwar to Poladpur Ghat Road : आंबेनळी घाटात संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यानचा घाट मार्ग वाहतुकीसाठी पाच दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आंबेनळी घाटात काल संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यानचा घाट मार्ग वाहतुकीसाठी पाच दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. दरड कोसळल्यामुळे संपूर्ण रस्ता माती व दगडांनी अडवला गेला असून, दोन्ही बाजूंनी वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्ता बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पोलादपूरचे तहसीलदार कार्यालय आणि स्थानिक प्रशासनाने एक निवेदन जारी करत सांगितले की, हा मार्ग पुढील ५ दिवस प्रवाशांनी अथवा मालवाहतूक करणाऱ्यांनी वापरू नये. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या काळात महाबळेश्वर किंवा पोलादपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांनी प्रवासी योजना पुढे ढकलाव्यात किंवा अन्य मार्गांचा विचार करावा, असे प्रशासनाचे आवाहन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

SCROLL FOR NEXT