ambadas danve  saam tv
Video

Maharashtra Politics: गरीब, दलित लोकांची जमीन हडपने हाच शिरसाटांचा सामाजिक न्याय- अंबादास दानवे|VIDEO

Ambadas Danve Slams Shirsat:ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

Omkar Sonawane

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर माजी खासदार इम्तीयाज जलील यांनी दलित लोकांच्या जमिनी हडपले असा गंभीर आरोप केला होता. यावरच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी यावर भाष्य केले आहे. शिरसाठ यांची गाडीही दुबईवरून दुसऱ्याच्या नावावर आणण्यात आली आहे. राजकीय पदाचा वापर करून वर्ग बदलून लोकांना हाताशी धरून जमिनी घेणे आणि त्याही फक्त मंत्र्यांच्या मुलाला जागा मिळतात कसे आणि स्वस्त कसे याबाबत जलील यांच्या आरोपाची चौकशी व्हायला हवी.

रेडी रेकनारच्या खाली जाऊन सौदे होतात कसे याबाबत अधिकाऱ्यांवर ही कारवाई व्हायला हवी. या जमिनीसाठी पैसे आणले कसे? याबाबत शिरसाठ यांनी उत्तर द्यावे, शिरसाठ कोणाच्या नावाने गाडी घेतात वापरतात. ती दुबईहून आणली आहे असे मला कळले. भोंडवे नावाच्या माणसाच्या नावावर ती गाडी आहे. हे सगळं चालतय कसे? असा माझा सवाल आहे. हे सगळे शिवसेनेचे म्हणायचे नाही हे गद्दार आहे, जनतेची लूट हे करतात. तो पक्ष नाही असे धंदे करणाऱ्या लोकांचा तो गट आहे आणि म्हणूनच ते फसत आहे. अशी घणाघाती टीका अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांच्यावर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT