Ambadas Danve Press News SaamTv
Video

Ambadas Danve : दानवेंची महायुतीवर जोरदार टीका; बघा व्हिडिओ

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर येथे अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यात त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर सडकून टीका केली.

Saam Tv

इतके वर्ष रावसाहेब दानवे यांना पाकिस्तान चालत होता. 20-25 वर्षांत या पाकिस्तानला मोठं करणारे रावसाहेब दानवे हेच होते. आता आपला पराभव झाला म्हणून त्यांना पाकिस्तान दिसतो आहे. जिंकले असते तर वेगळं काही बोलले असते. अशी टीका विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर केली आहे. 'पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यामुळे सिल्लोड तालुका म्हणजे पाकिस्तान झाला आहे. अशी टीका काल रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यावर वि. प. नेते अंबादास दानवे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीकास्त्र डागले.

सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यात त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर सडकून टीका केली. ''या सरकारने कोणत्याही रंगाचा पेहेराव घातला, हिरवा निळा, लाल, पांढरा, गुलाबी असं काहीही घातलं तरी आतून हे सरकार काळंच राहणार आहे. या सरकारचा मूळ रंग काळाच आहे'', असा टोलाही दानवे यांनी यावेळी लगावला. तसेच मागासले पण दूर करून मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करू मुख्यमंत्र्यांची ही निव्वळ घोषणाच एका वर्षात राहिली असल्याचा गंभीर आरोप देखील अंबादास दानवे यांनी यावेळी राज्य सरकारवर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT