Kolhapur Protest saam tv
Video

Almatti Dam: अलमट्टी धरणाच्या विरोधात उदगाव टोल नाक्यावर काँग्रेसचा चक्काजाम आंदोलन|VIDEO

Satej Patil Warns of Direct Action: अलमट्टी धरणाच्या उंची बाबत महाराष्ट्र सरकारने तोडगा न काढल्यास थेट अलमट्टीवर धडक देऊ,असा इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे.

Omkar Sonawane

अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात कोल्हापूरच्या उदगाव टोल नाका येथे सांगली कोल्हापूर - मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. सुमारे दोन तास या ठिकाणी सांगली कोल्हापूर महामार्गावर चक्काजाम करण्यात आला.

यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती, तर अलमट्टी जाण्याच्या उंची वाढीबाबत जलसंपदा महाराष्ट्र जलसंपदा खात्याकडून 21 मे रोजी बैठकीचा आयोजन करण्यात आला आहे. राधाकृष्ण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. मात्र या बैठकीला आमदारांसह सर्वपक्षीय अलमट्टी धरण कृती समितीला निमंत्रण नसल्याने सतेज पाटलांनी आक्रमक भूमिका घेत थेट रस्त्यावर ठिय्या मांडला.

यावेळी आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्यासह नेत्यांनी देखील रस्त्यावर ठाण मांडत, जोपर्यंत लेखी बैठकीसाठी लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार,अशी भूमिका घेतली, त्यामुळे प्रशासनाची चांगली धावपळ उडाली, त्यानंतर अखेर जलसंपदा विभागाकडून बैठकीचा लेखी निमंत्रण देण्यात आल्यानंतर हे चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT