Beed News SaamTv
Video

Beed News : सरपंच संतोष देशमुख हत्येचा निषेध; सर्वपक्षीय मोर्चात राजकीय नेत्यांसह नागरिकांची लक्षणीय गर्दी | VIDEO

Santosh Deshmukh Death Case : बीडमध्ये आज संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय मुक मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला आहे.

Saam Tv

बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्य आरोपींना तातडीने अटक करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला आहे. या मुक मोर्चाला नागरिकांची गर्दी झाली आहे. 20 दिवस झाले तरी आम्हाला न्याय मिळाला नसल्याची भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली आहे.

या मोर्चाला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुले व पत्नीसह बंधू धनंजय देशमुख हे देखील सहभागी झाले आहेत. हा मोर्चा कोणाच्याच नेतृत्त्वात काढण्यात येत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. मोर्चाला समर्थकांची आणि राजकीय नेत्यांची गर्दी लक्षणीय आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील या मोर्चात सहभागी झाले आहे. यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. हा जनतेचा मोर्चा आहे. त्यामुळे मी देखील या मोर्चात सहभागी होण्यासाठी आलो असल्याचे यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचेही जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक खरातच्या मुलाची काल रात्री चौकशी

Mumbai Pune Tourist Spots: मुंबई-पुण्याजवळ वसलेल्या स्वर्गाहून सुंदर 'या' बेस्ट वीकेंड डेस्टिनेशनला द्या भेट

Oracle Layoff: कामावर येऊ नका; एका रात्रीत ३०,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं | VIDEO

Toll Price Hike: प्रवास महागला! महाराष्ट्रातील टोलच्या दरात मोठी वाढ, आता किती पैसे मोजावे लागतील ?

एकनाथ शिंदेंनी पहिला डाव टाकला, शिवसेनेत वेगवान हालचाली; श्रीकांत शिंदेंसह ३९ नेत्यांवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT