Shiv Sena protest against RCF company in Alibag turns violent saam tv
Video

RCF कंपनीविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराला धक्काबुक्की|Video

RCF Protest Turns Violent : शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली अलिबागमध्ये आरसीएफ कंपनीविरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पोलीस आणि आंदोलन कर्त्यांमध्ये धक्काबु्क्की झाली.

Bharat Jadhav

अलिबाग येथील RCF कंपनी विरोधात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलंय. शिवसेना कार्यकर्त्यांनी RCF कंपनी बाहेरील रस्त्यावर टायर जाळून जिल्हा प्रशासनाचा निषेध केला. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान रस्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आमदार दळवी यांच्यासह शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये धक्का बुक्की झाली. प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेणे, प्रदूषण, परिसरातील रस्ते आदी समस्यांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसैनिक आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update : रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून सांगोल्यात दांडक्याने मारहाण

Deep Amavasya : दीप अमावस्येला गव्हाचे दिवेच का लावतात? जाणून घ्या यामागची श्रद्धा आणि परंपरा

Gen Alpha Club : नांदेडमध्ये रस्त्यांची दुरवस्था,साम टीव्हीच्या Gen Z रिपोर्टरने अशी केली पोलखोल

गावरान स्टाईल वाघाट्याची भाजी; ताटात वाढताच सगळेच ताव मारतील

SCROLL FOR NEXT