Alibag Fishing Boat Capsizes  saam tv
Video

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Alibag Fishing Boat Capsizes : मासेमारीवरील बंदी असताना मच्छिमारी बोटी समुद्रात गेली होती. ही बोट अलिबागजवळील समुद्रात बुडाली. त्यातील ३ खलाशी बेपत्ता आहेत.

Bharat Jadhav

  • अलिबागजवळ खांदेरी किल्ल्याजवळ मच्छीमारांची बोट बुडाली.

  • बोटीवर ८ खलाशी होते, त्यापैकी ५ खलाशी ९ तास पोहत किनाऱ्यावर पोहोचले.

  • वाचलेल्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • उर्वरित ३ खलाशी बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

अलिबागजवळ खांदेरी किल्ल्याजवळ एक मच्छीमार बोट बुडाली आहे. बोटीवर ८ खलाशी होते यातील ५ बचावले असून उर्वरित तीन खलाशी बेपत्ता आहेत. बचावलेल्या ५ खलाशांनी ९ तास पोहत समुद्र किनारा गाठला. त्या पाचही जणांना अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तीन खलाशी अजून बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. आज सकाळी ७ वाजता करंजा येथील मच्छीमार बोट समुद्रात मासेमारी साठी निघाली होती. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बोट खांदेरी किल्ल्याजवळ आली. त्यावेळी लाटांच्या जोरदार माऱ्याने बोट बुडाली. मासेमारीवरील बंदी उठायला आणखी आठवडा बाकी असतानाच मच्छीमार बोटी समुद्रात गेल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT