Akshay Shinde Encounter Case News SaamTv
Video

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची चौकशी होणार; राज्य सरकारचा निर्णय

Badlapur News : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात आता राज्य सरकारने चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे.

Saam Tv

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची आता चौकशी करण्यात येणार आहे. एक सदस्यीय समितीकडून ही चौकशी करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या या समितीत निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले हे या सर्व प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

बदलापूर शाळेतील 2 चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचं पोलिसांनी एन्काऊंटर केलं होत. त्यांनंतर या सर्व घटनेवर न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले होते. प्रशासनावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर ही समिती आता चौकशी करणार आहे. ही एक सदस्यीय समिती असणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले हे आता या सगळ्या प्रकरणात चौकशी करणार आहे. अक्षय शिंदेच्या पालकांनी या एन्काऊंटर विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सरकारवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर आता राज्य सरकारने ही समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल काय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT