Akola Balapur Accident saam tv
Video

१०-१५ जणांना वाचवताना भरधाव ट्रक थेट शेतात उलटला; भीषण अपघाताचा VIDEO

Akola Balapur Accident : अकोल्यातील बाळापूरमध्ये भीषण अपघात झाला. पुलावर उभ्या असलेल्या दहा ते पंधरा जणांना वाचवण्याच्या प्रयत्नात अनियंत्रित झालेला भरधाव ट्रक थेट शेतात उलटला.

Nandkumar Joshi

अकोला येथील बाळापूरमध्ये ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. 10 ते 15 जणांचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक थेट शेतात जाऊन उलटला. दोन दिवसांपूर्वी या पुलावरून कार उलटून तिघांचा मृत्यू झाला होता. यातील अपघातग्रस्त कार बाहेर काढण्याचे काम सुरू होते. यावेळी ती कार बाहेर काढण्यासाठी महामार्गावरील पुलावर १० ते १५ जण उभे होते. त्याचवेळी वाडेगावकडून भरधाव ट्रक आला. अपघातग्रस्त कार बाहेर काढण्यासाठी मदत करणाऱ्या त्या १५ जणांना वाचवताना ट्रक अनियंत्रित झाला आणि बाजूच्या शेतात जाऊन उलटला. ट्रकमध्ये जनावरांच्या खाद्याची पोती होती. ती अपघातानंतर शेतात पडली. यात ट्रकचंही मोठं नुकसान झालं आहे.

याच ठिकाणी आदल्या दिवशी एका कारचा भीषण अपघात झाला होता. पुलाचे कठडे तोडून भरधाव कार खाली कोसळली होती. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला होता. एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मृत्यू झालेले सर्व जण बाळापूर शहरातील रहिवासी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT