Akola Mobile Blast Video Saam TV News
Video

Akola: बॅटरी गरम झालेला Mobile खिशात ठेवताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच! थरारक Video

Akola Mobile Blast Video: तुमच्याही मोबाईलची बॅटरी गरम होतेय? अकोला जिल्ह्यातील अकोटमधील धक्कादाय घटना नेमकी काय? पाहा सविस्तर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अकोला : अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खिशात ठेवलेल्या फोनमधून अचानक धूर येत असल्याचं एका तरुणाच्या निदर्शनास आलं. त्यानंतर त्याने तत्काळ फोन खिशातून बाहेर काढला आणि रस्त्यावर फेकला. इतक्यात फोनचा स्फोट झाला. सुदैवानं यात तरुण थोडक्यात वाचला. वेळीच प्रसंगावधान राखल्यानं थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. मात्र मोबाईलमुळे या तरुणाच्या पॅन्टचा खिसा पूर्णपणे जळाला होता. शंकर बुदला या तरुणाने नेहमीप्रमाणे मोबाईल फोन खिश्यात ठेवलेला. पण अचानक फोनमधून धूर आल्यानं तरुणालाही नेमकं काय झालंय, हे कळू शकलं नाही. मोबाईल गरम झाल्यामुळे त्याचा स्फोट झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जातेय. अकोल्यातील अकोट शहरात नगरपालिकेसमोरच मोबाईलच्या स्फोटाचा थरार घडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT