Akola Mayor Race saam tv
Video

Akola Politics : अकोला महापालिकेत हायव्होल्टेज राजकारण; भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार, ४ पक्ष एकत्र

Akola Mayor Race : अकोला महापालिकेत सत्तास्थापनेचा पेच वाढला आहे. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी चार पक्ष एकत्र आले आहेत.

Nandkumar Joshi

अक्षय गवळी, अकोला | साम टीव्ही

अकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. त्यामुळं सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी चार पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट एकवटले आहेत. दुसरीकडं महापौरपदावरून 'वंचित' आणि 'ठाकरे' गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान, भाजपनेही ठाकरे गटाशी संपर्क साधल्याने अकोल्यातील राजकारण आता 'हायव्होल्टेज' झालं आहे.

अकोला महापालिकेत कसं आहे सत्तेचं गणित?

अकोला महापालिकेची निवडणूक झाली. ८० जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. बहुमतासाठी कोणत्याही एका पक्षाला ४१ चा जादुई आकडा पार करावा लागणार होता. मात्र, निवडणुकीत कुणालाही मॅजिक फिगर गाठता आली नाही. भाजपला सर्वाधिक ३८ जागांवर विजय मिळाला. तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस राहिला. काँग्रेसच्या २१ जागा निवडून आल्या. ठाकरे गटाचे सहा उमेदवार निवडून आले. तर शिंदेसेनेचा एक उमेदवार विजयी झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही फार काही यश मिळालं नाही. अवघी एक जागा जिंकून आली. तर शरद पवार गटाने तीन जागा जिंकल्या. वंचित बहुजन आघाडीला पाच जागांवर विजय मिळाला. एमआयएम पक्षाने ३ जागांवर विजय मिळाला. तर २ अपक्ष उमेदवारही निवडून आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fruit Juice For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण फळांचा ज्यूस पिऊ शकतात का? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आमदार नारायण पाटील भाजपच्या मेळाव्यात

केसांचे आरोग्य सुधारायचे आहे? रोजच्या आहारात आजच समाविष्ट करा 'या' ५ शक्तीशाली बिया

Kalyan : धक्का लागल्यानं डोकं सटकलं, चालकावर धारदार शस्त्रानं हल्ला; कल्याणमध्ये रक्तरंजित थरार!

Dussehra Horoscope: दसऱ्याला 3 राशींचं नशीब चमकणार! अडकलेली कामं पूर्ण होण्याचे संकेत, पैशाच्या समस्या दूर होणार

SCROLL FOR NEXT