Akola rain | अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. SAAM TV
Video

Akola cloudburst : ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला, गावात पाणी शिरलं; पाहा VIDEO

Akola Heavy Rain : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. गावातील रस्ते जलमय झाले होते. काही घरांमध्ये पावसाचं पाणी घुसलं.

Saam Tv

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात काही भागात पुन्हा ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. शनिवारच्या मुसळधार पावसानंतर रात्री पुन्हा मुसळधार पाऊस झाला. रुईखेड आणिअकोली जहागीर गावांमध्ये अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. रात्रभर गावकऱ्यांचे मोठे हाल झाले. गावातल्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं दिसलं. शेत शिवारातदेखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. मुंबई, पुण्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. जुलै महिन्यात अनेक ठिकाणी झालेल्या पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली होती. यात घरांचं आणि शेतीचं मोठं नुकसानही झालं आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातही कालपासून पावसानं जोर धरला आहे. शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस बरसला. त्यानंतर रात्रीही पावसाची बॅटिंग सुरू झाली. अनेक गावांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळं एरव्ही कोरड्या असलेल्या रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. तर अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT