Kalyan News Updat SaamTv
Video

Akhilesh Shukla : शेजारधर्माला भाषेचा मुद्दा केला, Video मधून अखिलेश शुक्लाने केले आरोप|Marathi News

Kalyan News : कल्याणमध्ये उच्चभ्रू सोसायटीत अमराठी माणसाकडून मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणानंतर आता या प्रकरणातील अखिलेश शुक्ला याने व्हिडिओ तयार करून प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

आमची पाचवी पिढी कल्याणमध्ये राहते आणि मी स्वतःला मराठी भाषिक समजतो. काल झालेला वाद हा केवळ शेजारधर्माशी निगडीत होता. त्याला भाषेचा मुद्दा बनवला गेला, असं स्पष्टीकरण अखिलेश शुक्ला याने दिलं आहे.

कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल भागात असलेल्या एका उच्चभ्रूंच्या सोसायटीत काल मराठी कुटुंब मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध करण्यात आला. मारहाण प्रकरणी संबंधित मंत्रालयीन अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी जोर धरत होती. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यांनंतर आता या प्रकरणातील मारहाण करणारा अधिकारी अखिलेश शुक्ला याने एक व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. त्यात त्याने घडलेल्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. अखिलेश शुक्ला याने पोलिसांना स्वाधीन होण्यापूर्वी हा व्हिडिओ तयार केला आहे. त्यात त्याने म्हंटले आहे की, माझ्या पत्नीवर आधी हल्ला झाला त्यानंतर माझ्या मराठी भाषिक मित्रांनी मला वाचवले. आमची पाचवी पिढी कल्याणमध्ये राहते. देशमुख कुटुंबीयांनी अर्वाच्य भाषेत भांडण केले. माझ्या पत्नीला केसांनी पकडून आधी मारहाण केली गेली होती, असं त्याने सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure : BP नियंत्रणात ठेवायचा आहे? मग पाणी पिण्याच्या या 7 गोष्टी अजिबात दुर्लक्षित करू नका

Mumbai AC Local Train: लोकलचं AC बंद, प्रवासी गुदमरले; आता लोकलच्या आतही मृत्यूची भीती?

Amir Khan Marriage: आमिर खान लव जिहादचा ब्रँड अम्बेसेडर; तिसऱ्या लग्नावरून वाद उफाळला

कॉकरोच आंदोलन उधळण्याचा कट कुणाचा? अभिजीत दिपकेंच्या पोस्टनंतर ठाकरेंचाही दावा

Pune Weather Update: पाऊस येणार की नाही? कसं असेल हवामान? हवामान विभागाने वर्तवला पुढील चार दिवसांचा अंदाज

SCROLL FOR NEXT