Pune University News SaamTv
Video

Pune News : पुणे विद्यापीठात अभाविप आक्रमक; जोरदार घोषणाबाजी

Pune University : विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.

Saam Tv

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाविरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. आक्रमक भूमिका घेत अभाविपकडून निद्रा नाश आंदोलन करण्यात येत आहे. पुणे विद्यापीठातील परीक्षा विभाग झोपलेलं आहे, असा आरोप यावेली आंदोलकांकडून करण्यात आला आहे. त्यांना जागं करण्यासाठी हे निद्रा नाश आंदोलन करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. जोरदार घोषणाबाजी यावेळी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. पुणे विद्यापीठाच्या प्रशासकिय विभागात हे आंदोलन सुरू आहे. अद्यापही अनेक विभागांचे निकल लागलेले नाहीत. त्यात सातत्याने विलंब केला जात आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. अभाविपने आक्रमक भूमिका घेतल्याने विद्यापीठातील परीक्षा विभाग कार्यालयाचा दरवाजा बंद करण्यात आला होता. मात्र संतप्त आंदोलकांनी दरवाजा उघडून परिसरात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT