Ajit Pawar Saamtv
Video

Ajit Pawar : .. तर मी ब्लॅक लिस्ट करेल, अजित पवारांनी दिली ठेकेदारांना तंबी | Video

Ajit Pawar Warns Contractors : रस्त्याची कामं ही चांगल्याच दर्जाची व्हावीत अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉन्ट्रॅक्टर्सला दिल्या आहेत.

Saam Tv

विकासकामं आणि रस्त्याची कामं दर्जेदारच झाली पाहिजे. आम्ही निधी दिला आहे. कामं नीट केली नाही तर मी संबंधित ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करेल, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना ठेकेदारांना दिली आहे. ब्रिटिश काळातील कामं शंभर शंभर वर्ष टिकली. आपली कामं २५ वर्ष सुद्धा टिकत नाहीत. कॉन्ट्रॅक्टर कामं कशाला घेतात? त्यांना कोणी काम घ्या असं मागे लागलेलं नसतं, असे खडेबोल देखील अजित पवार यांनी यावेळी ठेकेदारांना सुनावले आहेत.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, चांगल कामं केलं नाही तर मी काहीही न बघता अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकेल. तुम्ही तुमचा नफा नक्की कमवा. पण आमचं काम नीट करून द्या. कोणत्याही पुढाऱ्याने कामात लुडबूड करू नये. वाळू माझ्याकडून घ्या, सीमेंट माझ्याकडून घ्या, मला काम द्या, हे असं चालणार नाही. तुमच्यात रग असेल तर तुम्ही टेंडर भरा, काम घ्या आणि चांगलच काम करा, अशी तंबीच अजित पवार यांनी आता ठेकेदारांना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

SCROLL FOR NEXT