Ajit Pawar  Saam Tv
Video

Ajit Pawar: पुण्यातील साखर कारखान्यावर अजितदादांचे एकहाती वर्चस्व, 21 पैकी 21 उमेदवार विजयी

Ajit Pawar Sweeps Sugar Mill Elections in Pune: इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. अजित पवारांच्या पॅनलचे २१ पैकी २१ उमेदवार विजयी झाले.

Priya More

इंदापूरमधील श्री छत्रपती साखर कारखान्यावर पुन्हा एकदा अजित पवारांचे वर्चस असणार आहे. या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे 21 पैकी 21 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. श्री छत्रपती कारखान्यावर श्री जय भवानी माता पॅनलला एक हाती सत्ता मिळवण्यात पुन्हा यश आले आहे. या निवडणुकीत संघर्षमय झालेल्या लढतीमध्ये श्री जय भवानी माता पॅनलने श्री छत्रपती बचाव पॅनलचा सुपडा साफ केला.

इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. अखेर या निवडणुकीचा निकाल लागला. पुन्हा एकदा या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हाती सत्ता राखत निर्विवाद वर्चस्व मिळवलं. अजित पवार राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वातील श्री जय भवानी माता पॅनेलचे 21 पैकी 21 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजकीय प्रवास इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून सुरू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील जय भवानी पॅनल सर्वच्या सर्व 21 जागा जिंकून वर्चस्व निर्माण केले आहे तर विरोधकांना एकही जागा मिळाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT