Ujjwal Nikam Dismisses Rumours Over Six Persons in Ajit Pawar Plane  saam tv
Video

अजित पवारांसह विमानात ५ जण होते की ६ जण..? शंकांचं काहूर सुरू असतानाच उज्ज्वल निकम यांनी नेमकं काय सांगितलं? VIDEO

Ajit Pawar Plane Crash : बारामती येथे विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. मात्र, या अपघाताबाबत शंका उपस्थित करून चौकशीची मागणी केली जात आहे. विमानात पाच की सहा जण होते, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

Nandkumar Joshi

दिवंगत अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात? सुरुवातीला विमानात सहा जण होते, असं सांगण्यात येत होते, पण मृतदेह पाच मिळाले, अशी शंकाही उपस्थित करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे (AP) आमदार अमोल मिटकरी आणि महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी माध्यमांशी बोलताना या विमान दुर्घटनेबाबत संशय व्यक्त करत चौकशीची मागणीही केली होती. त्यानंतर इतर राजकीय पक्षांतील नेत्यांकडूनही विमान दुर्घटनेवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. शंका-कुशंकांचं काहूर माजलेलं असताना भाजप खासदार आणि ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

विमानात सहा जण होते याबाबत कोणताही पुरावा अद्याप समोर आलेला नाही. संशय निर्माण करून घटनेला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही ते म्हणाले. विमानात सहा प्रवासी होते असं अधिकृतरित्या कुठेही विमानतळावरील अधिकारी, विमान कंपनीनं जाहीर केलेले नाही. त्या विमानात इंधन इतकं होतं की सर्व मृतदेह जळून खाक झाले होते हे छायाचित्रांमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे अपघातात झालेल्या मृत्यूबद्दल वेगवेगळे संशय निर्माण करून कलाटणी दिली जात आहे, असं निकम म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरात याला तिसऱ्या 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Mahabaleshwar Tourism: महाबळेश्वरपासून फक्त २० किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; विकेंडला नक्की प्लान बनवा

Asha Bhosle- Shraddha Kapoor Relation: अभिनेत्री श्रद्धा कपूर आशा भोसले यांना आजी का म्हणायची? काय होतं खास नातं?

Shocking : जत्रेत बेशुद्ध केलं, नंतर निर्जनस्थळी सामूहिक बलात्कार; तरुणीसोबत भयंकर घडलं

पंढरपूर ॲसिड हल्ला प्रकरणात ट्विस्ट! तरुणीनेच रचला हल्ल्याचा बनाव; पोलिसांनी असा लावला छडा

SCROLL FOR NEXT