Ajit Pawar On Hindi Language row  saam tv
Video

'हिंदी भाषा सक्ती'ला अजित पवार यांचा विरोध; म्हणाले, पाचवीपासून... | VIDEO

Ajit Pawar On Hindi Language row : पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयाला विरोध होत असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही 'हिंदी सक्ती'ला विरोध केला आहे. हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयाबाबत ते नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊयात या व्हिडिओमधून.

Nandkumar Joshi

मराठी आणि इंग्रजी शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून विरोधकांनी रान उठवलं असतानाच, सत्ताधारी पक्षाचे प्रमुख नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिलीपासून हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. हिंदी भाषा पाचवीपासून शिकवण्यात यावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला विरोध केलाय. हिंदी भाषा पाचवीपासून शिकवण्यात यावी, असे ते म्हणाले. तर पहिली ते चौथीपर्यंत मराठी भाषा शिकवावी, असंही ते म्हणाले.

मला असं वाटतं की पहिली ते चौथीपर्यंत हिंदी असू नये. पाचवीपासून हिंदी शिकवावी. पहिलीपासून मराठी भाषाच शिकवावी. मराठी लिहिता-वाचता यावी. पहिलीपासून सेमी इंग्रजी सुद्धा सुरू केली आहे. भाषा कुठली शिकू नये या मताचे कुणीच नाही. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचंही मत हेच आहे, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT