Ajit Pawar on NCP Crisis Saam TV News
Video

NCP News: मजबुरीही नाही, तडजोड तर बिलकुलच नाही! Ajit Pawar यांचं मोठं विधान

NCP Crisis News Today: भाजपसोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप उडाला होता. त्यावर बोलताना अजित पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली

Saam TV News

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावर मोठं विधान केलं. भाजपसोबत जाणं म्हणजे कोणती मजबुरी होती का किंवा तडजोड केली गेली का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी मोठं विधान केलं. भाजपसोबत जाणं म्हणजे कोणतीही मजबुरी नव्हती, इतकंच काय तर कोणतीही तडजोडही करण्यात आली नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं. फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. दरम्यान, याआधीच्या निवडणुकांमध्ये मोदी सरकारच्या विरोधात काम केल्याची आठवणही अजित पवार यांनी यावेळी करुन दिली. शरद पवार यांच्याशी फारकत घेत अजित पवार यांनी बंड करत भाजपसोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप उडाला होता. त्यावर बोलताना अजित पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. नेमकं त्यांनी केलेलं विधान काय होतं, तेच या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT