Ajit Pawar Saam Tv
Video

NCP News : अजितदादांचा बंडखोर नेत्यांना दणका, विदर्भातील २ जणांचं निलंबन

Ajit Pawar NCP News : विधानसभा निवडणुकीनंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडखोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. विदर्भातील दोन नेत्यांचे निलंबन करण्यात आलेय.

Namdeo Kumbhar

Ajit Pawar NCP News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाले. पण याच निवडणुकीत पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत अजित पवार यांनी विदर्भातील दोन नेत्यांचे निलंबन केलेय. आभा पांडे आणि कृष्णा खोपडे यांचं पक्षातून निलंबन केलेय. तिकीट न मिळाल्यानंतर या दोन नेत्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता.

महायुती उमेदवाराच्या विरोधात पूर्व नागपुरातून निवडणूक लढल्याने अजित पवार गटाचा आभा पांडे यांची राष्ट्रवादी अजित पवार गटातून निलंबित करण्यात आलेय. पूर्व नागपूरमधील भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात आभा पांडे अपक्ष निवडणूक लढल्या होत्या. आभा पांडे पक्षाच्या सरचिटणीस तर राज्य महिला आयोगाच्या सदस्य होत्या.

त्याशिवाय उत्तर नागपूर मतदारसंघातून रमेश फुले यांनी देखील महायुतीच्या उमेदवार विरोधात निवडणूक लढल्याने पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! आज वाहतुकीत मोठे बदल, 'हे' आहेत पर्यायी मार्ग

Maharashtra Live News Update : पुणेकरांवरील 5 टक्क्यांवरील करवाढ रद्द

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या रखडलेल्या हप्त्याबाबत सरकारच्या हालचाली;₹१५००बाबत मोठी अपडेट समोर

Social Media Ban: अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?

Shivneri Fort : शिवनेरीवर शिवजयंती उत्सवाला गालबोट; मध्यरात्री चेंगराचेंगरी, अनेक शिवभक्त जखमी

SCROLL FOR NEXT