sharad pawar vs ajit pawar  saam tv
Video

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप घडणार? काका-पुतण्यात दिल्लीत दिलजमाई? VIDEO

Maharashtra Political News : दिल्लीत राजकीय वातावरण तापलेलं असताना अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केलीय... या भेटीचं नेमकं कारण काय? त्याबरोबरच काका-पुतण्याच्या भेटीमुळे कोणते प्रश्न निर्माण झाले आहेत? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच शरद पवारांची भेट घेतली.. भेटीचं कारण होतं शरद पवारांचा 85 वा वाढदिवस... मात्र या भेटीवेळी अजित पवारांनी शरद पवारांशी बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.. तर मी बाहेरचा नाही, घरातलाच असल्याचं विधान अजित पवारांनी केलंय.

अजित पवारांच्या भेटीनंतर युगेंद्र पवार आणि रोहित पवारांनी मात्र पवार कुटुंब एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. अजित पवारांनी सहकुटुंब पवारांची भेट घेतल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी चांगलंच तोंडसुख घेतलंय.

अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. ते नेमके काय आहेत? पाहूयात...

भेट की तह?

पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का?

दोन्ही राष्ट्रवादी विलीन होणार का?

शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार का?

गद्दारांना पाडा म्हणणारे शरद पवार त्यांना स्वीकारणार का?

पवारांनी भाजपला या भेटीतून संदेश दिला का?

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर वारंवार नजरा-नजर टाळणाऱ्या अजित पवारांनी दिल्लीत पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे ही कौटुंबिक भेट होती की आपल्यासाठी परतीचे दरवाजे खुले असल्याचा भाजपसाठीचा संदेश? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Designs: रोज वापरण्यासाठी छोटे पण आकर्षक मंगळसूत्र, हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Pune Bullet Train: गुड न्यूज! पुण्याला मिळणार २ बुलेट ट्रेन, मुंबईकरांनाही होणार फायदा

आजपासून ‘या’ दिवशी चिकन-मटणाची दुकाने बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय|VIDEO

Maharashtra Live News Update: दुचाकी फक्त दोनशे, तर चार चाकी वाहनामध्ये दोन हजार रुपयांचे इंधन भरता येणार

Rupali Chakankar: मोठी बातमी! रुपाली चाकणकराचं महिला प्रदेशाध्यक्षपदही जाणार? हालचालींना वेग आला

SCROLL FOR NEXT