Maharashtra Politics News SaamTv
Video

Political News : ''आमचं बरंचसं ठरलंय''; 'त्या' मागणीवर अजितदादांचे स्पष्टीकरण

Ajit Pawar News Uodate : ''मला मुख्यमंत्रिपद द्या'', अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहा यांच्याकडे केल्याच्या चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे.

Saam Tv

''राज्यात बिहार पॅटर्न राबवा आणि मला मुख्यमंत्रिपद द्या'', अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहा यांच्याकडे केल्याच्या चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. मंगळवारी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत माहीती दिली.

रविवारी मुंबई विमानतळावर महायुतीमधील महत्वाचे नेते आणि अमित शहांमध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अजित दादांनी केलेल्या मागणीची सर्वत्र चर्चा आहे. त्यावर स्पष्टीकर देताना अजित पवार यांनी, ''आम्ही राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. अमित शहा ही गणपतीच्या दर्शनाला आले होते. सध्या आमचे लक्ष ही महायुतीच्या सरकारने सुरू केलेल्या योजना राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवणे याकडे आहे. विधानसभा निवडणुकांच्या बाबतीत आमच ठरलेलं आहे, वेळ आली की तुम्हाला सांगू'' असं म्हणत अजितदादांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी मी केली नसल्याचं म्हंटल आहे. अशी कोणतीही मागणी मी केली नाही, या सगळ्या भुलथापा असल्याचंही अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT