Maharastra Politics : Saam tv
Video

Ajit Pawar : अजित पवार गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; कोण आहेत नवीन चेहरे? वाचा

Ajit Pawar latest news : अजित पवार गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत काही नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे. अजित पवार गटाने तब्बल २७ स्टार प्रचारकांची नावे जाहीर केली आहेत. या स्टार प्रचारकांच्या यादीत अभिनेते सयाजी शिंदे यांच्या नावाचाही समावेश आहे.

अजित पवार गटाने 'एक्स'वरून विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सयाजी शिंदे या प्रमुख नावांचा या यादीत समावेश आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

अजित पवार गटाच्या यादीत अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे. तसेच पक्षाने नुकतेच पक्षात प्रवेश केलेले अभिनेते सयाजी शिंदे यांचीही निवड करण्यात आली आहे. तसेच धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे यांचाही स्टार प्रचारक यादीत समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या यादीतून नवाब मलिक यांना वगळल्याने शरद पवार गटाने अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT