Ajit Pawar Funera Saam Tv
Video

Ajit Pawar Funeral: वडिलांचं शेवटचं दर्शन घेताना पायावर डोकं ठेवून जय पवार ढसाढसा रडले, काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

Ajit Pawar Death: अजित पवार यांच्यावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी जय पवार ढसाढसा रडले.

Priya More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळले. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामतीत अंत्यसंस्कार होत आहेत. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास सुरूवात झाली आहे. पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडून धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले. त्यानंतर वडिलांचे अंतिम दर्शन घेत असताना जय पवार ढसाढसा रडले. वडिलांचे डोक्यावरील छत्र हरपल्यामुळे जय पवार यांना अश्रू अनावर झाले. अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित आहेत. राज्यातील सर्व राजकीय नेते आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत मोठी गर्दी केली आहे. अजितदादा परत या असं म्हणत कार्यकर्त्यांनी टाहो फोडला. अजितदादांना निरोप देण्यासाठी बारामतीत लाखोंच्या संख्येने जनसमुदाय जमला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : कामाचा माणूस हरपला! अजित पवारांना पार्थ पवार यांनी मुखाग्नी दिला, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

Ajit Pawar Funeral : महाराष्ट्र पोरका! जनसामान्यांचे 'दादा' अनंतात विलीन; बारामतीत लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप

Bank Jobs: सरकारी बँकेत नोकरीची संधी; पगार ₹८५०००; पात्रता अन् अर्जप्रक्रिया वाचा

Mumbai Helipad : कोस्टल रोडवर लवकरच हेलिपॅड सुरु होणार; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT