Ajit Pawar funeral News Saam Tv
Video

Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या निधनाने अंगरक्षक भावूक; अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागर उसळला

Ajit Pawar funeral News : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांच्या अंगरक्षकाला देखील अश्रू अनावर झाले असल्याचं पाहायला मिळतं आहे. या घटनेने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

Alisha Khedekar

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. पवार कुटुंबियांसह बारामतीकरांनी देखील टाहो फोडला आहे. इतकंच नव्हे तर अजित पवार यांचे बॉडीगार्ड देखील भावूक झालेले पाहायला मिळालेले. आज अजित पवार यांच्यावर आज ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुंबईहून बारामतीकडे येताना अजित पवार यांच्या खासगी विमानाचा काल सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. यावेळेस त्यांच्या सोबत ४ जण होते. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात अजित पवारांसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. या बातमीनंतर अवघा महाराष्ट्र हळहळला आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरली.

ही घटना प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याच्या आणि राज्यातील नेत्यांच्या मनाला चटका लावून जाणारी ठरली. आज अजित पवार यांना निरोप देताना सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवारांचे अंगरक्षक म्हणून काम करत असलेले एस पी यू महेश बोबडे आणि इम्तियाज मोमिन यांच्या अश्रूंचा बांध अखेर फुटला. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे ही अधिकारी अजित पवारांच्या सावली प्रमाणे त्यांच्यासोबत होते. आज अखेरची मानवंदना देताना या दोघांना अश्रू अनावर झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या दिशेने, बारामतीत शोकाकुल वातावरण

Rule Change: LPG गॅस, सिगारेट ते बँका; १ फेब्रुवारीपासून या नियमात होणार बदल

Maharashtra Live News Update : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

Winter Care : सफरचंदाचे साल फेकून देताय? थांबा! त्वचेसाठी करा 'असा' वापर, कायम चेहरा करेल ग्लो

Rubina Dilaik : जुळ्या मुलींच्या जन्मानंतर आता दुसऱ्यांदा आई होणार टिव्हीची 'छोटी बहू'? गुडन्यूज देत VIDEO केला शेअर

SCROLL FOR NEXT