Ajit Pawar Plane Crash saamtv
Video

Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा, जय पवारांनाही संशय

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारीला अपघात झाला होता. बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळलं. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता.

Priya More

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला. अशातच आता अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी मोठी मागणी केली आहे. जय पवार यांनी या अपघात प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीला विमानाचे उड्डाण करण्यास तात्काळ बंदी घालावी आणि या कंपनीच्या गैरव्यवहारांची चौकशी झाली पाहिजे अशी देखील मागणी केली.

जय पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, 'विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. व्हीएसआर कंपनीला तात्काळ उड्डाणे चालविण्यास बंदी घालून, त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे, मिस यू डॅड'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Hairstyles: उन्हाळ्यात घामामुळे केस खराब होतात? या 5 ट्रेंडी हेअरस्टाईल्स करा

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीसाठी मोठ्या हालचाली; शरद पवार मैदानात?, VIDEO

Maharashtra Live News Update : वाशिममध्ये शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला

बारामती पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान|VIDEO

By-Election: मविआ की सुनेत्रा पवार? बारामती पोटनिवडणूकाबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील: संजय राऊत

SCROLL FOR NEXT