Ajit Pawar News Saam TV
Video

Ajit Pawar News : मी मुख्यमंत्री, अजित पवारांनी कापला केक

अजित पवार यांना अनेकवेळा मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली. आता अजित पवारांनी एक अनोखा केक कापला आहे.

Tushar Ovhal

मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की....हा आशय एकप्रकारे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करतोय. मुख्यमंत्रीपदासाठी नेहमी चर्चेत असलेल्या अजित पवारांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त का होईन पण मुख्यमंत्री केलंच..सर्वाधिक पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवारांचीही मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा कधी लपून राहिली नाही. काही महिन्यांपूर्वी तर त्यांच्या आईनेही दादा सीएम व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आलं. रायगडमध्ये सुनील तटकरेंच्या रुपानं केवळ एक खासदार निवडून आला. बारामतीतही अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. मात्र आता विधानसभेसाठी पक्ष नव्या जोमानं सज्ज झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पूर्वसंध्येला सांगवीमध्ये कार्यकर्त्यांनी हा खास केक तयार केला होता. अजित पवारांनी हा केक कापताच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT