Assembly Election News SaamTv
Video

VIDEO : विधानसभा निवडणुका एका टप्प्यात ? मोठी अपडेट आली समोर

Assembly Election : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या तयारी सुरू आहे. त्याचसाठी निवडणूक आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. यावेळी झालेल्या बैठकीत काही महत्वाच्या बाबी समोर आल्या आहे.

Saam Tv

आगामी विधानसभा निवडणुका एका टप्प्यात घ्या, अशी मागणी सत्ताधारी पक्षातील अजित पवार गट आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक वय मर्यादा 85 वरून 80 करण्यात यावे अशीही मागणी त्यांनी केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या तयारी सुरू आहे. त्याचसाठी निवडणूक आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. निवडणूक आयोगाचे काही केंद्रीय अधिकारी मुंबईत दाखल झालेले आहेत. त्यानंतर त्यांची सर्व पक्षांच्या काही नेत्यांसोबत बैठक झाली आहे. याच बैठकीत सत्ताधारी पक्षातील अजित पवार राष्ट्रवादी गट आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आगामी विधानसभा निवडणूका या एकाच टप्प्यात घेण्यात याव्यात अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ही 85 वरून 80 करण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT